पत्र क्र ९
जाऊ तिथे खाऊ! अहो खाणारच न ? कशासाठी पोटासाठी...... प्रत्येक ठिकाणी निरनिराळी खाद्यसंस्कृति!! पण ती अनुभवायला फ़ाइव स्टार च्या बाहेर यायला हवे हे मात्र नक्की. भारतभर फिरताना आपण लोक मजेत असतो. कुठेही...
जगाच्या पाठीवर ... कधीतरी कुठेतरी पत्र क्र ९ जाऊ तिथे खाऊ! अहो खाणारच न ? कशासाठी पोटासाठी...... प्रत्येक ठिकाणी निरनिराळी खाद्यसंस्कृति!! पण ती अनुभवायला फ़ाइव स्टार च्या बाहेर यायला हवे हे मात्र नक्की. भारतभर फिरताना आपण लोक मजेत असतो. कुठेही जा, मस्त पदार्थ मिळतात. कधी मुन्नारच्या एका टपरीवजा होटेल मधे मस्त गरमागरम इडली संबार खावे. तो स्वयंपाकी आणि त्याची आई असे दोघे ते होटेल चालवत होते. गरीब वाटले. म्हणाले, पहाटे साडे चार पासून बिक्री सूरु होते, आम्ही साडे तीनलाच बनवायला चालु करतो. इतके भराभर इडली चे साचे रीकामे होत होते. छान पाऊस, रम्य सकाळ आणि गरम इडली सांबार!! होटेल चे वर्णन म्हणजे, “टपरी” , बस. भुवनेश्वरचे रसगुल्ला मार्केट पण असेच मस्त. ज़ेव्हा भितरकणिका अगदी दुर्गम होते तेव्हा तिथे गेलो होतों. पण रस्त्यात एक अत्यंत खेड़े , त्यात कसली ती टपरी रे देवा, बाहेरुन बघणाराला वाटेल कस जावे आत? पण आमचा ड्राइवर ऐकेना, बाऊदी चलो मस्त खाना है यहाँ. चडफड़त गेलो आत. मोडक्या तोड़क़या , लांब फळकूटाचे टेबल आणि तसलेच फळकुट बसायला. एकुण अवतार!! बसलो. अतिशय स्वच्छ , पितळेची ताटली ठेवलीसमोर आणि पसरट ताटली वाटीसारखी. त्यात बटाट्याचीं रस्सा भाजी आणि ताटलीत गरमगरम मसाला पूरी. आणि काय चव होती, अहाहा!! आम्ही तर ख़ुश च झालो. वर बिल इतके कमी झाले की आम्ही थोड़े जास्ती पैसे दिले ते पण तत्परतेने परत केले. पन्ना हुन खजुराहो ला जाताना केन घड़ियाल पार्क ला जाताना , एका पार छोट्या आणि आड़ वळणाच्या खेड्यात जे गरम गरम समोसे मिळाले ते केवळ अप्रतिम!! गव्हासाठी प्रसिद्ध सिहोर ग़ावाच्या जवळ , निर्जन ठिकाणी, एक ढाबा होता. रस्त्यावर वर्दळ तशी क़मीच. पण खुप अंतर असेच निर्जन . बघु या काही आहे का ईथे? म्हणत आत गेलो . इतक्या सुंदर , छान आणि चविष्ट पोळया!! दिल ख़ुश, पेट फूल!! दिरांग च्या एकूलत्या एक मोठया रस्त्याला मागे टाकुन जरा ग़ल्लीत गेलो आणि चक्क मुंबई भेल ही पाटी पाहुन विरघळलोच . इतकी मस्त भेळ केली त्याने!! ईशान्येकडे फिरत असताना बटाटा भाजी आणि पूरी ! शेवटी मुलानी सांगीतले ,”आई , प्लीज़ हयांना बटाटा वडा शिकव, इतके छान बटाटें होतात ईथे तर मस्त वडे करत जा , असेही सांग ग “ सौराष्ट्रात धाब्यावर गेल्यास प्रथम एक ट्रे छोट्या छोट्या वाट्याचा आणतात, लोण्याने भरलेल्या!! सोबत मोठा जार भरुन ताजे ताक, किती छान वाटते. कितीतरी ठिकाणी असे त्या त्या ठीकाणचे वैशिष्ट्य!! अंबोली घाटाच्या आधी मधे, एक छोटी टपरी. त्याच्याच शेतातला उस काढ़ून ताज़ा रस देत होता. इतका चविष्ट रस!! कारण त्यात त्या मालकाचे आदरातिथ्य मिसळले होते न. सोबतचे परदेशी पाहुणे तर इतके ख़ुश झाले, हे मशीन मिळाले तर घेउन जाईन म्हणे!! पण ख़रच आदरातिथ्य करावे तर ह्या आड़गावच्या टपरी मालकानीच !!
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.