पत्र क्र ८
परदेश प्रवास म्हणजे एक चिंताच असते माझ्या मनात. त्या इमिग्रेशन ऑफिसर ची तर मला एक अनामिक भितीच वाटते. वास्तविक मला कधी कोणी अड़वले नाही पण त्यांच्या त्या अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकल्यात न . कोणी...
जगाच्या पाठीवर ... कधीतरी कुठेतरी पत्र क्र ८ परदेश प्रवास म्हणजे एक चिंताच असते माझ्या मनात. त्या इमिग्रेशन ऑफिसर ची तर मला एक अनामिक भितीच वाटते. वास्तविक मला कधी कोणी अड़वले नाही पण त्यांच्या त्या अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकल्यात न . कोणी म्हणे ते विचित्र असतात बर, तिथुन परत पाठवतात. कोणी म्हणे आपण काहीच बोलायचे नाही, काय न काय . पण मला सांगा, पलिकड़चा माणुस ज़र आपल्याला काही विचरतोय, तर आपण गप्प कसे बसणार? खुप वर्षापूर्वी सिंगापुरला त्या ऑफिसर ने बऱ्याच सूचना दिल्याच चांगल आठवत, डिजिटल युग आले नव्हते न तोवर. ब्रिटन ला गेले तेव्हा पण अशीच भिती घातली होती लोकांनी. मला विचार पडला, विसा देताना तर तुम्हीं सगळ विचारता न, का येताय अन किती दिवस रहाणार वगेरे मग का शंका? भाऊ बाहेर वाट बघत होता, त्याला भेटायची घाई होती. पण इमिग्रेशन चीं भली मोठी रांग. जास्त वेळ गेला की आपली घालमेल अगदी शिगेला पोचते. मी सगळे ऑफ़ीसर बघत होते. मनातल्या मनात , ही बाई बरी दिसतेय फ़ार काही विचारत नाही बाँ, माणसे पटकन पुढ़े जात आहेत. तो बुवा किती स्लो आहे, पाठ करतोय की काय सगळ? आणि तो पलिकडचा? बापरे, भितीदायकच दिसतोय, धिप्पाड, डोक़यावर केसांचे भले मोठे टोपले, रागीट असावा , आपल्याला नको हां , असे मूल्यमापन करत होते. आणि हाय देवा, नेमका त्याच्याच पाशी नंबर आला. आता काय ? अशी भिती वाटली . विचारच करत होते, तेवढ्यात, सेमिनार साठी आलात न? असे अत्यंत मृदु आवाजात त्याने विचारले. मी हो म्हटले. पण तुमचा भाऊ पण असतो न? म्हटल, हो. तर दिवाळी ईथेच करणार का? मी चक्रावले, हो तर म्हटल. अजुनही काही विचारले त्याने . मला कळेना, सगळे जर माहित आहे तर हां विचारतोय का? म्हणे, देशात येणाऱ्यांची ते अशीच कसुन चौकशी करतात. आता काय म्हणावे? यूरोप मधे मात्र फ़ार काही प्रश्नोत्तरे नव्हती. पण अमेरिका वाले नक्कीच विचारतात. आमचा ऑफिसर भारतीय वंशाचा होता, जरा बरे वाटले बघुन. Stanford च्या graduation ला आलोय म्हटल्यावर बाकी नाही पण सामानात काय आहे त्याचि चौकशी केली मात्र. भारतीयांची सवय माहित होती अगदी. मात्र छोट्या देशांचे इमिग्रेशन ऑफिसर जरा स्वागतशील असलेले वाटले. साधारण सगळयांची गोष्ट सारखिच, मात्र लक्षात रहाण्याजोगे कंबोडियाचे ऑफ़ीस. व्हीएटनाम च्या चाउडॉक हून अत्यंत अविस्मरणीयअसा तो मिकांग नदीतला प्रवास. नदी चे भले मोठे पात्र. त्यात त्या सूपरफ़ास्ट बोटिचा प्रवास, खुप रम्य परिसर. बोट पण सुंदर होती. व्हीएटनाम चीं हद्द संपलि, बोट किनाऱ्याला लागली, इमिग्रेशन झाले आणि थोड्या अंतरावर पुन्हा थांबली, कंबोडिया च्या हद्दीत. वर आलो पायऱ्या चढ़ून, आणि अहाहा, काय सुंदर नजारा!! विस्तीर्ण परिसर. सुंदर बगीचे. छोट्या छोट्या दगड़ी इमारती. अधेमधे कमळाचे हौद, त्यात सुंदर रंगित कमळ फ़ुललेलि. वा मस्तच. गार हवा. प्रसन्न वातावरण. लागू दे बाबा कितिही वेळ, आपल्याला चालेल. सर्व कर्मचारी पण अत्यंत आदबशीर. बगिच्यात बसायची सोय केली होती. ५,६ जणाना बोलवत. कामही अगदी पद्धतशीर पणे, काही गड़बड़ गोंधळ न करता. “किंगडम ऑफ कंबोडिया” ह्या नावाला साज़ेसे सगळे वातावरण होते. इतक्या रम्य परिसरातले ते immigration संपूच नये असे वाटत होते. मात्र पासपोर्ट वरचे ते इमिग्रेशन चे स्टॅंप बघायला किती छान वाटते!! माझा एक मित्र एका NGO मधे काम करतो आणि अनेकवेळा आफ्रिकेत फिरत असतो. आमचि स्पर्धा लागली असते, कोण जास्ती स्टॅंप लावते पासपोर्ट वर ते. दरवेळी किती झाला ग काउंट? विचारतो. मग मीहि खुशीत उत्तर देते.......
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.