पत्र क्र १०

तर आपण जाऊ तिथे खाऊ बोलत होतों हां. हे खाणे पुराण कित्येक पत्र पूरेल बर!! पण..... भारतात फिरताना ज़ेवणखाण म्हणजे चंगळच असते. प्रत्येक भागाचे वैशिष्ट्य वेगळे , चव वेगळी आणि आनंद तर अवर्णनीय!! गंगटोक...

कीर्ती वडाळकर
||3 min read

जगाच्या पाठीवर ... कधीतरी कुठेतरी पत्र क़्र १० तर आपण जाऊ तिथे खाऊ बोलत होतों हां. हे खाणे पुराण कित्येक पत्र पूरेल बर!! पण..... भारतात फिरताना ज़ेवणखाण म्हणजे चंगळच असते. प्रत्येक भागाचे वैशिष्ट्य वेगळे , चव वेगळी आणि आनंद तर अवर्णनीय!! गंगटोक च्या ग़ल्लीतले गरम मोमो असोत, जोधपुर चे फ़ेमस चाट आणि क़ुल्फ़ी असोत , अल्लेपीचे पुट्ट कींवा अरकु व्हॅलीतली मस्त कॉफ़ी!! कुठेही जा, रसना तृप्तच होणार. पण परदेशीचे मात्र मज़ेदार अनुभव. सर्वप्रथम मी शाकाहारी आहे असे सांगीतल्यावर , ऐकणारा ,”परग्रहांवरून” आलेली वाटते अशा आश्चर्याने बघतो. मग अनेक विचित्र प्रश्न. तुला फारच अशक्तपणा जाणवत असेल? तुला खुप supplement घ्यावे लागत असतील, पण मग तू काय खाते, वगेरे. हल्ली तरी एकवेळ ठीक आहे, शाकाहारीं शब्द सगळया ना माहित झालाय पण २५ वर्षापूर्वी नक्किच नव्हता. एका सेमिनार साठी बाली च्या एका अति उच्चभ्रू होटेलात थांबलो होतों. मुख्य शहरापासून खुप लांब, समुद्रकिनारी, रम्य ठिकाणी, एकटेंच होते ते. आम्ही चांगले आठवडाभर रहाणार होतों. गेल्या गेल्या सांगीतले त्यांना आम्ही शाकाहारी आहोत, एक दोघे जैन पण होते. तिथल्या स्टाफ़ नी हो, काही प्रॉब्लम नाही, सगळ आहे ईथे असे सांगीतले आणि आम्ही निवांत झालो. ज़ेवणाच्या ठिकाणी सुंदर रचना केली होती. डिश हातात घेउन सगळ फ़िरुन आले, पण शाकाहारी तर काहीच नव्हते. मी त्याच स्टाफ़ ला बोलवले आणि विचारले तर तो म्हणाला, “अहो, चिकन नका घेऊ, त्यातला भात घ्या, तो शाकाहारी आहे, ब्रेड घ्या, भाजीतले मटन बाजू ठेवा, सगळ शाकाहारी आहे बघा.” काय बोलावे कळेना . रात्रिच्या ज़ेवणात त्याने इतके गोड़ पदार्थ बनवले, नारळ घालून, मैदा वापरून, रंगित आणि आकर्षक़! आता तुम्हीं खाऊ शकाल म्हणे. मालदीव ला तर त्यांचे पाहुणे म्हणुन गेलो होतों. आम्हाला काय हवे, काय लागतें वगेरे त्यांनी आधीच विचारुन घेतले होते. अर्थात् शाकाहार हे महत्वाचे सांगीतले होतेच. संध्याकाळी पोचल्यावर माले चा फेरफटका मारुन झाला. आणि ज़ेवणासाठी पोचलो. बघतो तर काय? खुप डिश , सुंदर सजवलेल्या पण सगळया माशाच्या!! मी विचारले तर म्हणे हो ही तर ईथली भाजीच आहे. अहो ईथे काहीच पिकत नाही पण मासे मात्र मुबलक तर आम्ही ते खातों. म्हटल आम्ही नाही खात, मग धावाधाव करुन, एक बांग्लादेशी स्वयंपाकी बोलावला आणि पुढचे सगळेदिवस मजेत सरले. आफ्रिकेत भारतीय खाद्य सर्वत्र मिळते. ते लोक तर आपले पदार्थ खुप आवडी ने खातात. युगांडा ला तिथल्या एका कुटुंबात राहत होतों. एक दिवस मी म्हटल ,”मी बनवु का काही? “ सगळे खुप ख़ुश झाले. लगेच आम्ही जवळच्या मॉल मधे गेलो. कणिक, बेसन , पनीर, काही भाज्या वगेरे वस्तु घेउन आलो. मग तर मज़ा, सोहळा झाला स्वयंपाकाचा!! त्यांना फ़ार गम्मत वाटली. पोळया, पालक पनीर, गाजर हलवा आणि बटाटें वडे!! त्यांची लहान मुलग़ी तर भिजवलेल्या कणकेचे गोळेच खात सुटली, मस्त लागतेय म्हणे. अग, थांब , कच्चे नको खाऊस, पण ती ऐकेचना. आमचा मित्र सरकारात मोठया हुद्दयावरचा अधिकारी! दुसऱ्या दिवशी त्याचि काही महत्वाची लंच मीटिंग होती, पण मी भाज्या घालून मसाला पराठा केला होता. मला म्हणे प्लीज़ टिफ़िन दे न , दाखवतो सगळयाना. त्यांच्या अंगणात लिंब खुप लागली होती. मी छान लोणचे घालून दिले. म्हटल, महीनाभराने मुरेल मग खा. माझा तिथला मुक्काम संपला. महीनाभराने साधारण, तिला विचारले , अग ते लोणचे बघीतलेस का, मुरले असेल तर खा. म्हणाली , कधिच संपले ते, आम्हाला कुठला इतका पेशंस? अरे देवा ! आशियाई देशात सुंदर सजवलेल्या शाकाहारी वस्तु मिळतात. आणि त्या त्या देशाची चव असते त्यात. Vietnam ला जाताना मित्राने तिथे फ़क्त क़ुत्रा आणि साप मिळेल तुला खायला असे सांगून टेंशन च दिले होते. आणि फिरताना ख़रच सगळीकडेच सोललेल्या अवस्थेत हे प्राणी टांगलेले होते. बापरे, आता काय? पण तिथल्या शाकाहारी वस्तु सुद्धा खुप छान होत्या, आमच्यासाठी स्पेशल बनवल्या होत्या. देशोदेशी अनेक पदार्थ खाल्ले पण माउंट टिटलिस च्या पायथ्याशी खाल्लेले गरमगरम समोसे त्या थंडित खुप सूखाउन गेले

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments