पत्र क्र ११

खाण्याचीं मज़ा असतेच पण खरेदी हां सर्व प्रवासाचा अविभाज्य भाग! मोठमोठया रंगीबेरंगी बाज़ारपेठांच आकर्षण न वाटल तरच नवल. भारतात फिरताना ख़रच खुप मज़ा असते. खुप प्रकारच्या वस्तु उपलब्ध असतात. त्या त्या...

कीर्ती वडाळकर
||3 min read

जगाच्या पाठीवर ... कधीतरी कुठेतरी पत्र क्र ११ खाण्याचीं मज़ा असतेच पण खरेदी हां सर्व प्रवासाचा अविभाज्य भाग! मोठमोठया रंगीबेरंगी बाज़ारपेठांच आकर्षण न वाटल तरच नवल. भारतात फिरताना ख़रच खुप मज़ा असते. खुप प्रकारच्या वस्तु उपलब्ध असतात. त्या त्या ठीकाणच्या अग़दी स्पेशल! कपड़े, हस्तकलेच्या वस्तु , घरगुती वापराच्या वस्तु, काय न काय . समुद्र किनारी शंखशिंपले, नारळाच्या कवट्या वापरून बनवलेल्या वस्तु, डोंगराळ भागात मसाले, कुठे चामड्याच्या वस्तु तर कुठे बांबुच्या! क़ापड मात्र सगळीकडेच आणि ते ही त्या त्या भागाच्या वैशिष्टयासह. मला पण अर्थातच खरेदी आवड़ते. सर्व हस्तकौशल्याच्या अचाट वस्तु मी कुठुन कुठुन जमा केल्यात. साधारण पणे टुरिस्ट कंपन्या एका कुठल्या बाज़ारला प्राधान्य देतात, त्याच ठिकाणी नेतात. पण आम्ही असे कधी न जात असल्यामुळे आड़ जागी पण जाता येते. असेच गोव्यात फिरत होतों. एका छोट्या गावात एक आजी शंखाच्या वस्तु बनवत होती. मी कुतूहलाने बघायला गेले. तिने खुप कलाक़ुसर केली होती. आणि भाव इतका पडेल की मला ख़रच वाटेना, आपली मस्करी तर नाही करत ही? पण तशी वाटत तर नव्हती. मी म्हटल, “ इतकी कमी कींमत का लावतेस? वस्तु किती सुंदर आहेत. “ म्हणाली, “अग, हां दर्या मला भरभरुन शंख फ़ुकट देतो, ते ग़म मी आणते फ़क्त, ते काही फ़ारसे महाग नसते. मग क़शाला जास्ती पैसे आकारु?” म्हटल ,” अग तूझी मेहेनत?” त्यावर ती उत्तरली,” मेहेनत नाय गो बाय ती, मला खुप आनंद होतों नवी वस्तु बनलि माझ्या हातुन की. त्याला मेहेनत नाय ग म्हणु”. मी निरुत्तर! मी खुप वस्तु घेतल्या. एवढ़ी ख़ुश झाली. वर एक छानसा शंख भेट पण दिला. क़ोकणात असाच एक शाळकरी मुलगा माझ्या खरेदीवर खुप सुखावला होता. आणि विविध शंखाचे एक छोटे बंडल भेट दिले. तुमच्या खरेदीने मी शाळेची फी भरणार ताई. हे ऐकुन मी त्याचि चौकशी केली आणि काही पैसे देऊ केले. पण तो जाम घेइना. वस्तु विकूनच मी पैसे जमवणार , म्हणे, मला खुप मोठा वाटला तो. बोमडिला च्या पुढ़े , एका गावात हातमागावर सुंदर शाली विणणारी एक महिला मला अशीच लक्षात राहिलि. तिचे विणकाम खुप सुंदर होते. आणि ती पण खुप गोड़ होती. पण तिच्या शाली घेणे शक्य नव्हते कारण मुंबईत त्याचा उपयोग शून्य. आणि लोकर जाड त्यामुळे वजनदार झाली होती. आम्ही मस्त जवळचा खाऊ काढला, तिच्याबरोबर बसून ख़ाल्ला. तिच्या लहान मुलांना बरोबर आणलेले शालोपयोगी सामान दिले. मज़ा आली. मुंसियारी च्या जवळएके ठिकाणी सशाच्या लोकरीच्या वस्तु मिळतात. एकदम मुलायम. तिथल्या बाज़ारात डोंगरातले खुप मसाले घेतले. इंदोरला मैत्रिणीशी ठरवून खरेदी ला जाणार होतों. मुलाने ,”परतीच्या वाटेवर कर खरेदी, त्या मावशीला सांग तसे,” म्हटल्यावर मी हो म्हटले. पण मुलाने चपळाई करुन इंदोर ला पुन्हा येणार नाही परतीच्या वाटेंवर, असे प्लान केले. पण ज्याच्या नशीबात खरेदी असते न ........ उज्जैन ला आलो. संध्याकाळचा फेरफटका मारताना लक्षात आले भव्य मार्केट समोरच होते, मग काय विचारता? आणि महेश्वर ला तर इतकी खरेदी झाली की “आई आता कार भरली नेसुनच बस सगळया साडया” इतका वैतागला मुलगा. रायपुरला , भिलाईला गेले की कोसा खरेदी एका ठराविक ठिकाणी करते. ते विक्रेते पण ओळखु लागले होते. पण असेच एका ट्रिप मधे, कामामुळे अजीबात जायला जमले नाही. जरा वाईट वाटले. विमानतळात शिरले, सामान वगेरे दिले. कॉफ़ी घेतली, नवऱ्याला फ़ोन करुन, काहीच घेऊ शकले नाही, सांगीतले . आणि तेवढ्यात समोरच्या नवीनच होत असलेल्या दुकानातुन माझा ओळखींचा विक्रेता मला हाक़ मारत होता. मी आश्चर्यचकित!! त्याने नुकतेच ते दुकान थाटले होते. मग काय? खरेदी व्हायलाच हवी न?

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments