पत्र क्र १२

परदेशी फिरताना पण खरेदी आलीच न . पण डोक़याला फ़ार ताप होतों, आपण सतत प्रत्येक वस्तुचे रुपयात मूल्य करणार. ख़रतर असे करु नये पण आपले मन आपल्या नकळत हिशोब करु लागतें. पहिल्यांदा हे सततचे गणित करुन...

कीर्ती वडाळकर
||2 min read

जगाच्या पाठीवर ... कधीतरी कुठेतरी पत्र क्र १२ परदेशी फिरताना पण खरेदी आलीच न . पण डोक़याला फ़ार ताप होतों, आपण सतत प्रत्येक वस्तुचे रुपयात मूल्य करणार. ख़रतर असे करु नये पण आपले मन आपल्या नकळत हिशोब करु लागतें. पहिल्यांदा हे सततचे गणित करुन वैताग आला आणि आपण काही घेऊ शकु ही आशाच मावळली . ईतक्या सुंदर वस्तु पण ..... मग म्हटल, अरे जिथे जाऊ तिथला विचार करावा. पण ख़रच देशोदेशी त्या चलनाचीं कथाच और असते. बाली च्या हस्तकलेच्या वस्तु सुंदर पण किमंत ? ऐकुनच ड़ोके चक्रावायचे. सगळे भाव hundred thousand रूपिया मधे सांगणार. शून्याची ख़ैरात नुसती!! एके ठिकाणी काही थोड़े डॉलर बदलले तर काही लाख रूपिया मिळाले!! त्या देणाऱ्या बाईला म्हटल, “अग इतक़या रुपयात आमच्या देशात एक अक़्ख घर मिळत “. तिला इतके आश्चर्य वाटले. युगांडा मधे पण असेच , आपला १ रुपया म्हणजे साधारण ४९, ५० युगांडन शिलिंग. प्रत्येक वस्तूचीं किम्मत म्हणजे एक भला मोठा आकडा. दर वेळी गणित करुन कंटाळले . आणि अगदी छोटी वस्तु उचलावी तर काही ह्जारात किम्मत बघुनच पहिले दडपण येते. वीयट्नाम ची पण तसलीच कथा. पण अमेरिका सोडुन गेली तरी तिथे सर्रास डॉलर घेतात. अगदी सिंगापुर डॉलर, थाय बाथ सुद्धा घेतात. त्याने थोड़े सोपे होते काम पण ते कितपत योग्य आहे कळत नाही. श्रीलंकेत पहिल्यांदा गेलो तेव्हा तिथल्या मित्राने सांगीतले होते, ईथे भारतीय चलन पण आनंदात स्वीकारतील पण देऊ नका कारण हां पैसा अतिरेक्यांना पुरवला जातों. मग खुप काळजी घ्यायला हवी. पण एकुणच मला अशा देशांत जायला आवड़ते जिथे आपल्या चलनाचे मूल्य जास्त आहे. बरे वाटते खरेदी करताना. पण अमेरिका, यूरोप, ब्रिटन मधे उगाचच आपण फ़ार गरीब आहोत असे वाटत राहते. अर्थात् चलन महाग असले तरी आपण खरेदी करायचे थोड़ीच राहतो? यूरोप मधे फिरताना यूरो सगळीकडेच चालते आणि विसा पण एकच चालतो ते एक फ़ार छान आहे, एक यूरो चा रेट माहित करुन घेउन तो पाढा लक्षात ठेवला की काम सोपे. आधी चलनाच्या नोटा विमानतळावर उतरुन घ्याव्या लागत आता काम बरेच सोपे झाले आहे. शिवाय क्रेडिट कार्ड नी तर खुपच सुविधा होते. कितीही ग़ैरसोय असो आपण आपली खरेदी थाम्बवायची नाही. एक मज़ा आठवली. एका नामवंत कंपनी बरोबर मावस भाऊ न वहिनी ब्रिटन आणि यूरोप च्या टुरला गेले. लंडनच्या फ़िरस्तीत एक दिवस गाइड ने सांगीतले,”उद्या तुम्हीं मनसोक्त खरेदी करा, तुम्हाला जगप्रसिद्ध हॅरडस मॉल मधे नेणार आहे. वहिनी ने आधीच त्या मॉल चीं माहिती काढ़ून ठेवली होती त्यामुळे सगळी मंडळी उत्साहात आत गेल्यावर ही दोघे जवळचे सुंदर पार्क बघायला गेली. नेमून दिलेल्या वेळेआधी परतआली तर सर्व खरेदीवीर थंडित घामाघूम झाले होते तिथले भाव बघुन!!

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments