पत्र क्र १३
तर चलनाचा एवढा गोंधळ मी सांगितला म्हणुन मी परदेशी खरेदीच करत नाही असे मुळीच नाही बर! छोट्या छोट्या बाज़ारपेठामधुन रंगीबेरंगी वस्तु बघत फिरताना खुप मज़ा येते. बहुतेक ठिकाणी महिला विक्रेत्या असतात, मग...
जगाच्या पाठीवर ... कधीतरी कुठेतरी पत्र क़्र १३ तर चलनाचा एवढा गोंधळ मी सांगितला म्हणुन मी परदेशी खरेदीच करत नाही असे मुळीच नाही बर! छोट्या छोट्या बाज़ारपेठामधुन रंगीबेरंगी वस्तु बघत फिरताना खुप मज़ा येते. बहुतेक ठिकाणी महिला विक्रेत्या असतात, मग त्यांच्याशी गप्पा मारत त्यांचे जीवन समजून घेता येते. जे गरीब देश आहेत तिथे हस्तकलेच्या वस्तु खुप दिसतात. आणि बाज़ारपेठा पण साधारण सारख्याच असतात. अर्थात् वस्तु आणि कला देशपरत्वे बदलतात . पण त्या सगळया पेठा मस्त असतात . प्रगत देशातील वातानुक़ुलित , भव्य, चकचकित मॉलपेक्षा खुप सुंदर. बाली ला प्रत्येक गावाची एक कला, पेंटिंग म्हणाल तर सगळा गाव मग पेंटिंग च करणार, तसेच चांदीच्या वस्तु, बांबुच्या वस्तु, एका गावात एकच प्रकार! पण काय कला सुंदर म्हणुन सांगू, बघतच रहावे. काय अन किती घेणार? त्यातन भावावरून घासाघीस क़रावी लागतें. अरे देवा मग तर कठीणच . पण बरोबर एक गुजराती होते. मला म्हणाले, “तुम्हीं वस्तु पसंत करा, मी भाव करुन देतो”. ते एकटे आले होते, मग घरी काही न्यायला हवे न? मी वस्तु ठरवली की ते २ चा भाव करायचे. इतक़या हटके वस्तु घेतल्या आम्ही . पण लहानपणी पासून पाठ केलेली मसाल्याचीं बेटे ती, मसाला कुठे मिळेना. म्हणे, मसाले आम्ही फ़क्त निर्यात करतो. फ़ार शोधल्यावर एके ठिकाणी थोड़े दिसले , छान पांढरे मिरे पण मिळाले. बांबु आणि नारळापासून बनलेली एक सुंदर घंटा पण सांभाळत आणली. आपटयाच्या , पानांपासून शेंगापासून बनलेले फ़ोटो अल्बम तर खुप सुंदर. कलाक़ुसर फ़ारच अप्रतिम . युगांडा मधे असेच कलाकूसरीच्या वस्तुंचे बाज़ार. मण्यांच्या वस्तु आफ्रिकेत खुप दिसतात. अगदी लहानमोठया आकाराचे , विविध रंगाचे मणी. आणि त्यापासून बनलेल्या कितीतरी वस्तु, अगदी चपलासुद्धा. सिंगापुर तर खरेदीसाठीच प्रसिद्ध, किती प्रकारचे मॉल ते , अबब!! तिथली जेम्स गॅलरी, रत्न वापरून केलेल्या विविध वस्तु. किती कल्पकता!! बॅंकॅाक चीं पण जेम्स गॅलरी सुंदर , तिथल्या मोत्याच्या वस्तु तर आपण घेऊच अशा. श्रीलंकेत पण खुप सुंदर बाज़ार. समुद्रकिनारी शंखांच्या विविध वस्तु, रंग़ित वाळु तर होत्याच पण शहाळया च्या पण सुंदर वस्तु घेतल्या. डोंगरभागात चहापण. मज़ा तर रत्नपूरा मधे. म्हणे रावणाचीं सर्व संपत्ति तिथे दडवलेलि आहे म्हणुन तिथे खुप छान रत्ने मिळतात. तुमच्या जन्मतारखे नुसार अत्यंत महागडे रत्न तुम्हाला दाखवतात. आणि तुम्हीं घ्यायला तयार होईपर्यत भाव कमी कमी करत जातात. मला ५० हज़ार सांगून अगदी ५ हज़ारावर आला तो. पण मी काही असल्या प्रलोभनाना कधी बळी पड़त नाही. नंतर एकदा ऐकले, एका परिचिताने भरपूर मोठया रकमेला घेतलेले रत्न चक्क काचेचा तुकडा होते !!
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.