पत्र क्र ८१

शिक्षणाची आवड, अप्रूप असणाऱ्या व्यक्तींनी जगातील काही उत्तम युनिव्हर्सिटीं ची माहिती घेतलीच पाहिजे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी त्यातलीच एक. कॉट्स वल्ड चा एक भाग असलेले, त्या भागातील मानाचे पान हे...

कीर्ती वडाळकर
||4 min read

शिक्षणाची आवड, अप्रूप असणाऱ्या व्यक्तींनी जगातील काही उत्तम युनिव्हर्सिटीं ची माहिती घेतलीच पाहिजे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी त्यातलीच एक. कॉट्स वल्ड चा एक भाग असलेले, त्या भागातील मानाचे पान हे ऑक्सफोर्डशायर. सम्पूर्ण गावाची सफर करायला मजाच येते.

साधारण युनिव्हर्सिटी म्हटले कि आपल्या डोळ्यापुढे

एक बंदिस्त आवारात बांधलेल्या इमारतींचे चित्र येते तसे इथे नाही

. सगळा गावच युनिव्हर्सिटी आहे. वेगवेगळ्या इमारतींमध्ये वेगवेगळे कॉलेज आहेत

. प्रवेश घेण्यासाठी प्रत्येकाची वेगळी प्रक्रिया आहे

. तिथे शिकत असलेले विद्यार्थी

, खर्चाला पैसे कमवण्यासाठी पर्यटकांना सगळ्या परिसराची चालत सफर करवतात

. अर्थात ऑनलाईन बुकिंग करावे लागते

, थोडी फी देऊन

. तिथल्या फज बनवणाऱ्या दुकानात सगळ्यांना जमवून तो आधी थोडी जुजबी माहिती देतो आणि

एकेका इमारतीचे महत्व सांगत पुढे पुढे घेऊन जातो

. सुरवातीलाच

भव्य वाचनालय आहे .

सुंदर दगडी इमारतीत बांधलेले ते वाचनालय इतके सुंदर आहे. कितीतरी विद्यार्थी पुस्तके घेऊन जाताना, वाचताना दिसतात. वातावरणात "अभ्यास" भरून होता. ब्रिटन मधली सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी लायब्ररी म्हणून ती प्रसिद्ध आहे. लाखो पुस्तके आहेत इथे.

एकूण ३९ कॉलेजेस मिळून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बनते. आज जवळपास २५००० विद्यार्थी तिथे अनेक शाखांमध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यास करत असतात.

१०९६ मध्ये शिक्षण द्यायला सुरुवात केलेली जगातील दोन नंबरची सगळ्यात जुनी युनिव्हर्सिटी. असं म्हणतात तिथे शिक्षणाची प्रक्रिया त्याआधी पण चालू होती, मात्र त्याचे ठोस पुरावे नाहीत. ह्या नंतर युनिव्हर्सिटी ची वाढ झपाट्याने झाली. इतरत्र शिकायला गेलेले विद्यार्थी इंग्लंड मध्ये परतु लागले. ११९० पर्यंत भरपूर विद्यार्थी, शिक्षक, ह्यांच्या सकट युनिव्हर्सिटी ची भरभराट सुरु झाली. १२०९ च्या आसपास, काही विद्यार्थी,शिक्षक आणि गावकरी ह्यांच्यात झालेल्या वादातून केम्ब्रिज युनिव्हर्सिटी उदयाला आली. १२४८ मध्ये राजा तिसरा हेनरी ने ऑक्सफर्ड ला राजाश्रय दिला. आजवर अनेक मान्यवर ह्या युनिव्हर्सिटीतून शिकून बाहेर पडले. अनेक शोधांचा उदय इथे झाला.

ब्रिटनला अनेक पंतप्रधान देणारी युनिव्हर्सिटी अशी तिची ख्याती आहे.

इतक्या आधी सुरु झालेल्या ह्या नामांकित युनिव्हर्सिटीत सुरुवातीला स्त्रियांना प्रवेश नव्हता. १८७५ मध्ये एक समिती गठन करण्यात आली. त्यात, दोन तट पडले, एकाला वाटे सगळे शिक्षण स्त्रियांना द्यावे पण स्वतंत्र कॉलेज मधून तर दुसऱ्या गटाचे म्हणणे होते सगळे नाही पण घरगुती शिक्षण स्त्रियांना द्यावे. ह्या वादातून दोन वेगळे कॉलेज तयार झाले, अर्थातच फक्त महिलांना प्रवेश देणारे. त्यात २५ जणींनी प्रवेश घेतला. पण पदवी मात्र द्यायची कोणी? मग युनिव्हर्सिटी ऑफ डब्लिन पुढे आली आणि त्यांनी ह्या स्त्रियांना पदवी दिली. पहिल्या महायुद्धाच्या काळात , जेव्हा निष्णात डॉक्टर्स ची कमतरता भासू लागली, तेव्हा स्त्रियांना वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळाला. हळूहळू, आणखीन, पूर्ण विद्यार्थिनी असलेली कॉलेजेस आली, आणि १९२० मध्ये सर्वप्रथम "वेरा ब्रिटन" ला मानाच्या "शेल्डोनियन हॉल" मध्ये पदवी प्रदान करण्यात आली. आणि शंभर वर्षाच्या ह्या काळात, अनेक स्त्रियांनी उत्तम योगदान देऊन युनिव्हर्सिटीचे नाव अधिकाधिक प्रसिद्ध केले. अकरा वर्षे ब्रिटनच्या पंतप्रधान होऊन उत्तम कामगिरी केलेल्या मार्गारेट थॅचर ऑक्सफर्डच्याच. इंदिरा गांधी, ऑंग सॅन सु कि ह्या पण इथेच शिकल्या.

सुरुवातीला महिलांसाठी वेगळी कॉलेजेस आणि कोर्सेस होते. पण हळूहळू सर्वच कॉलेजेस नी मुलांना पण मुलींबरोबर प्रवेश देऊन, २००६ साल पर्यँत, स्वतःचा विशेष दर्जा संपवला.

संपूर्ण गाव युनिव्हर्सिटी आहे. प्रत्येक कॉलेज ची वेगळी इमारत, विद्यार्थ्यांचे हॉस्टेल, पार्क, प्रवेश प्रक्रिया, सगळे वेगळे. तसे असले तरी, सगळ्यांच्या वर, एक कॉमन गव्हर्निंग कौन्सिल आहे. सगळ्यात वर एक चान्सलर , मग पाच व्हाईस चान्सलर , आणि इतर प्रतिनिधी असतात.

अनेक वस्तू संग्रहालये आहेत . त्यात ऐतिहासिक महत्वाचे अनेक दस्तऐवज जपून ठेवलेले आहेत. त्यातले १६८३ साली स्थापन झालेले अशमोलियन संग्रहालय, ब्रिटन मधलं पहिलं आणि जगातलं पाहिलं युनिव्हर्सिटी संग्रहालय आहे. त्यात मायकेल एंजेलो , लिओनार्दो दा विंची, पिकासो, वगैरे थोर कलाकारांच्या मूळ कलाकृती जतन केलेल्या आहेत. निसर्गाचा इतिहास जतन करणाऱ्या संग्रहालयात ट्रिनोसोर्स रेक्स चा सांगडा आहे. जगातला एकमेव पूर्ण , डोडो पक्षी, अर्थात त्याचे अवशेष इथे आहेत. पिट रिव्हर्स संग्रहालयात पाच लाखांपेक्षा जास्ती पुरातन वस्तू जपल्या आहेत. विज्ञानाच्या संग्रहालयात अनेक महत्वाच्या वस्तू, प्रयोगांचे दस्तऐवज आहेत. क्राईस्ट चर्च चित्रांच्या संग्रहालयात २०० पेक्षा अधिक जुन्या कलाकृती आहेत.

कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना अधिकृत कार्यक्रमांना, परीक्षांना, वगैरे युनिफॉर्म घालावा लागतो. त्यात पांढरा शर्ट, पांढराच टाय, काळी पॅन्ट किंवा स्कर्ट, काळा गाऊन , असा काहीसा वेष करावा लागतो. परीक्षेसाठी जाताना त्यावर एका विशिष्ट रंगाचे कार्नेशनचे फुल लावावे लागते. पहिल्या परीक्षेला पांढरे कार्नेशन, दुसऱ्या परीक्षेला गुलाबी आणि सर्व परीक्षा पास करून फायनल परीक्षेला मात्र अभिमानाने लाल कार्नेशन लावून जातात. आणि हि फुले विद्यार्थ्यांची "मुले" घेऊन देतात. सगळ्यांना स्वतःची मुले नसतात काही. संपूर्ण युनिव्हर्सिटी तुमचे कुटुंब आहे. इथे जॉईन झाल्यावर, तुमच्या एक वर्ष पुढे असलेले दोघे तुमचे आई वडील, दोन वर्ष पुढे असलेले तुमचे आजी आजोबा आणि

बरोबरीचे दोघे भाऊ, बहीण म्हणून तुम्ही निवडायचे. तुम्ही "मुले" निवडण्यासाठी अर्ज करायचा. पहिल्या वर्षात, तुमचे "आई वडील" तुम्हाला फुले देतील. दुसऱ्या वर्षात जेव्हा तुम्ही आई वडील व्हाल, तेव्हा तुमची मुले तुम्हाला परीक्षेला जाताना फुले देतील. बदल्यात, तुम्ही त्यांना लागेल ती मदत करायची.

लाल फुल लावून परीक्षा देऊन एका विशिष्ट दारातून बाहेर पडावे लागते. तिथे तुमची मुले तुमची वाट बघत असतात. हातात रंगीबेरंगी फोम, वाईन, पाणी, वगैरे उडवून फायनल परीक्षा देऊन आलेल्याचे "trashing" केले जाते. परीक्षार्थी सगळ्यांना चुकवत धावत जाऊन नदीत उडी मारतात.

अभ्यासा व्यतिरिक्त अनेक कला, खेळ इथे आहेत. त्यांच्या सोसायटी, क्लब आहेत. नाटक, संगीत, खेळ,वगैरेंच्या खूप स्पर्धा होतात, त्यातून विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. केवळ अभ्यास न करता, विद्यार्थ्यांची सर्वार्थाने प्रगती व्हावी ह्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातात.

सर्व कॉलेजेस चा शिस्तबद्ध पदवीदान सोहळा "शेल्डोनियन हॉल" मध्ये होतो. सफरीच्या शेवटी, आपला विद्यार्थी मित्र तिथे घेऊन जातो. अतिशय अभिमानाने प्रत्येक जण तो शिस्तबद्ध सोहळा अनुभवतो आणि साश्रू नयनांनी युनिव्हर्सिटी चा निरोप घेतो.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments