पत्र क्र ७

नक्की घेउन जात. ३,४ वेळातर नागपुरहुनच गाड़ी घेउन गेलो होतों. पार काश्मीरला पण गाड़ीने गेलो होतों. मज़ा होती खुप. संध्याकाळ च्या आसपास जे मोठे गाव येइल, तिथे चांगले हॉटेल बघुन मुक्काम करायचा. सकाळी...

कीर्ती वडाळकर
||2 min read

जगाच्या पाठीवर ... कधीतरी कुठेतरी पत्र क्र ७ वड़िलांना पण पर्यटनाची खुप आवड होती. दर वर्षी कुठेतरी नक्की घेउन जात. ३,४ वेळातर नागपुरहुनच गाड़ी घेउन गेलो होतों. पार काश्मीरला पण गाड़ीने गेलो होतों. मज़ा होती खुप. संध्याकाळ च्या आसपास जे मोठे गाव येइल, तिथे चांगले हॉटेल बघुन मुक्काम करायचा. सकाळी कींवा रस्त्यात असलेल्या जागा बघायच्या. असे करत फिरायचो. काश्मीर प्रवास तर आजपण छान आठवतो. मध्यप्रदेश मधुन जात होतों. चंबळ नदी पार करायला पुल नव्हता. मोठया बार्जवर गाडया चढ़वून नदी पार करायचे. पण ती सेवा संध्याक़ाळच्या आत बंद होत असे. दुपारलाच आम्ही पोचणार अशा बेतात होतों. वाटेत ग्वाल्हेर होते पण ते परतीच्या वाटेवर बघणार होतों. त्यामुळे तिकडे न वळता पुढ़े जाणार होतों . आणि एके ठिकाणी पोलिसांनी थांबवले. मेडिकल विद्यार्थ्यांचा संप आहे आणि आंदोलनाने हिंसक रूप घेतले आहे. ते खुप जाळपोळ , दगडफ़ेक वगेरे करत आहेत. आता काय करावे? मग त्यांनीच सांगीतले, थांबा , आंदोलन दुपारि उशीरा कमी होइल मग काही गाडया एकत्र निघु, आमचि एक गाड़ी पुढ़े येइल. बराच वेळ वाट बघुन मोठा ताफ़ा जमवुन निघालो. पण चंबळपार करणारी सेवा मात्र मिळायची शक्यता मावळली होती. पण तरी पुढ़े तर निघु असे म्हणतच होतों आणि प्रवास सुरु केला तर मोठमोठया ट्रक वर आंदोलनकारी समोरुन आले आणि सर्व वाहनांवर प्रचंड दगडफ़ेक केली. केवढी दहशत! कसेबसे सुटलो आणि रात्र व्हायच्या आत मिळाले तिथे राहिलो. पुढ़े प्रवास करत करत ज़ेव्हा ऊधमपुरला पोचलो आणि पुन्हा सर्व गाडया अडवल्या. आता काय? घाबरलोच . त्याकाळी काश्मीरमधे प्रवेश घ्यायला काही परमिट लागायचे ते आमच्याकडे नव्हते. कोणी म्हणे रात्रझाली की अडवत नाहीत, जम्मू मधे पोचा, सकाळला पहिले ते काम करा. मग थांबलो एका ठिकाणी, अंधारहोण्याची वाट बघत. आम्ही काय लहान मुले, मस्त धूम करत होतों, आईवडिल आणि ड्राइवर काका होते न चिंता करायला. थोड्या वेळाने काही पोलिस आले आणि बाबांशी बोलले. बाबा ख़ुश झालेले दिसले. लगेच आम्हाला ग़ाडित बसायचे फर्मान आले. अरे, पण रात्र तर झाली नव्हती. पण धावलो सगळे गाड़ीकडे. एक उंच धिप्पाड , ख़ाकी गणवेशातील व्यक्ति बाबां बरोबर आली . आमची ओळखपरेड झाली. आणि प्रवास सूरू झाला. बाबा आणि ते गप्पा मारत होते. ते म्हणजे, आमच्या जवळ नसलेले परमिट issue करणारे अधिकारी होते. त्यांची गाड़ी बंद पडल्यामुळे पुढ़े कसे ज़ायचे हां प्रश्न होता. मोठया अधिकाऱ्याना कोणाबरोबर पाठवणार? रस्त्यात काही घातपात झाला तर? मग पोलिसांनी शोध घेतला. आमचे कुटुंब त्यांना विश्वास ठेवण्यायोग्य वाटले. आणि आमचा प्रवास मजेत झाला. पुढ़े परमिट पण त्यांनी दिले आणि अविस्मरणीय अशी काश्मीर सहल झाली.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments