पत्र क्र ४०
वाटून जातं. उंच उंच रेडवुड किंवा सिकोया ची झाडं असोत किंवा अगदी छोटसं मोगर्याचे किंवा गुलाबाचे झाड असो इतके प्राणापलिकडे जपलेली झाडं असतात ती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येता जाता कोणी सहज म्हणून...
“ वृक्षवल्ली आम्हा सोयरे
” असे असले तरी प्राणी
, पक्षी
, झाडं ही सगळी परदेशातली व्हिआयपी मंडळी
. या सगळ्यांच जतन करावं तर त्यांनीच
, असं कुठेतरी वाटून जातं
. उंच उंच रेडवुड किंवा सिकोया ची झाडं असोत किंवा अगदी छोटसं मोगर्
याचे किंवा
गुलाबाचे झाड असो इतके प्राणापलिकडे जपलेली झाडं असतात ती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येता जाता कोणी सहज म्हणून सुद्धा फळं , फुलं , पान
त्यांची तोडली असं होत नाही .
युरोपमध्ये खास फॉल कलर्स बघायला गेलो होतो
. रंगपंचमीचीच आठवण आली
. किती प्रकारचे रंग सृष्टी उधळत होती
! लांब लांब पर्यंत बघायला खूप छान वाटत होतं
. कुठे लाल, कुठे पिवळा, कुठे हिरवाच राहिलेला असे अनंत रंगांची उधळण बघून मन तृप्त झालं
. खूप झाडं बघितली.
कॉटसवर्ल्ड मध्ये फिरत असताना एका घरी मोठी मोठी सफरचंदाची झाडं दिसली
. पानोपानी फळं लगडलेली होती
. खाली सुद्धा खूप खच पडला होता
. घराचं फाटक उघडच होतं
. माझं भारतीय मन
, मी लगेच डोकावून बघायला लागले
. मोठी मोठी पाच सफरचंदाची झाडं आणि खाली पडलेला सफरचंदाचा गुलाबी गुलाबी
सडा !
जमिन किती सुंदर दिसत होती .
पण भावा नी लगेच मला मागे ओढलं. एकही फळ त्यातलं उचलायचं नाही
. म्हटलं, "मी उचलत नाही रे
, पण बाकी लोक का उचलत नाहीत
. किती फळं वाया जातात?"
. तो म्हणाला," इथे असेच असते.
कोणीही कोणाचीही झाडं , त्यावरची फुलं, फळं , काहीही तोडत नाही
." वेडेच आहेत
, असं मला वाटलं
. म्हणाला
, “
घरमालक कदाचित लंडनमध्ये किंवा कुठल्या तरी शहरात राहत असेल
. इथे तो फक्त शनिवार
- रविवार येईल
. ही सगळी फळं काढेल आणि बाहेर एका कार्टमध्ये लावेल
. त्याच्यावर बोर्ड लिहिल
, "फ्रूटस फॉर फ्री
” आणि मग येणारा जाणारा एक दोन फळं उचलेल त्यातली
.” अरे देवा
! मेडनहेड मध्ये फिरताना सुद्धा खूप प्रकारची फळझाडे दिसली
. फळांनी लगडलेली
! वहिनीचे ऑफिस तिथेच आहे. तिने एक गंमत सांगितली
. लोकल काउंटी ने , खूप फळं लागल्यावर , एवढ्या फळांचं काय करायचं म्हणून सगळ्या नागरिकांना आवाहन केलं की तुम्हाला हवी तेवढी फळं रविवारी येऊन घेऊन जा
. लोक अगदी छोटीशी एक बास्केट घेऊन त्यात एक किंवा दोन सफरचंद
, चार बेरीज
, दोन
- चार द्राक्ष, एखाद दुसरं पेअर अशी तोडून घेऊन गेले
." अरे बापरे! म्हटलं ,"आमच्या इथे एवढी फळ कधी उरणारच नाहीत ,मेलं एक मरतुकडं गुलाबाचं फुल सुद्धा उरू देत नाहीत झाडावर एवढी फ़ळं तर सोडणारच नाहीत "
. सर्व शहरां मधून कुंड्यांमधून अनेक प्रकारची फुलझाडे पण सुंदर फुललेली दिसतात आणि लोकल काउंटी मुद्दाम मोठमोठे प्लांटर्स पण तयार करते सुशोभीकरणासाठी.
व्हर्साय च्या राजवाड्याच्या मागे अतिशय सुंदर असं गार्डन त्यांनी केलंय
. मोठ्या मोठ्या झाडांना दिलेले आकार बघून खूप हरखून जायला होतं
. लांब लांब पर्यंत सुंदर , मोठी झाडे आणि त्यांना कल्पकतेने दिलेले सुंदर आकार. तो बगीच्या एक दिवसात
बघणे शक्य होत नाही
. तसेच जर्मनीचे ब्लॅक फॉरेस्ट, इतकी रम्य जागा! स्प्रूस आणि इतर खूप प्रकारची झाडं .
कॅलिफोर्नियामध्ये मोठी मोठी रेडवुड ची झाडं , बघायला अक्षरशः टोपी पडेल इतकी उंची आणि रुंदी पण खूप. अशा झाडांच्या मधून जाताना खरं म्हणजे नुसती रुंद नाही तर खूप जुनी अशी ती झाडं बघताना खूप आश्चर्य वाटतं. एके ठिकाणी तर झाडाच्या बुंध्यातून चक्क कार जाईल इतका मोठा बोगदा तयार केला आहे .
तिथे अनेक घरांमध्ये खूप सुंदर बगिचे फुलवलेले बघितले. एका घरातून तर खूप सुंदर असा मोगर्
याचा परिचित वास घेऊन अगदी घरची आठवण झाली. मोगर्
याचा खूप मोठा वेल लावला होता आणि तोही पानोपानी बहरला होता. त्या भागातली सगळी झाडं वेगळीच. कृष्ण कमळाचे अनेक रंग बघितले मग इथे प्रयत्नपूर्वक ते जमवले. .
लंडनजवळ फिरताना एक भाग जरा वेगळा जाणवला. जिथे खूप जास्ती भारतीय लोक राहत होते, त्यांनी कुठेही बगीच्या साठी जागा सोडलेली नव्हती आणि सगळ्या फरश्या घालून घेतल्या होत्या. भाऊ म्हणाला, "इथे काही आपल्यासारखे माळी मिळत नाहीत, प्रत्येकाला स्वतःची बाग स्वतः फुलवावी लागते आणि आपल्या भागातल्या लोकांना एवढ्या कामाची सवयच नसते. त्यामुळे अगदीच खूप आवड असल्याशिवाय , लोक बगिच्यात फारसं काही करत नाहीत. इथली हवा मात्र बऱ्याच झाडांना पोषक असाही आहे, त्यामुळे बरीच फुलझाडे लावता येतात. "
छोट्या छोट्या गावांमधून फिरताना प्रकर्षाने जाणवलं की अगदी म्हातारे म्हातारे लोक सुद्धा त्यांच्या घराभोवती छान सुंदर बागा फुलवतात.
काही काउंटिंमधून तर स्वयंसेवक ज्येष्ठ नागरिकांना मदत करतात आणि सुंदर अशा बागा फुलवतात. बऱ्याच शहरांमधून घराभोवती पुरेशी जागा नसेल किंवा जास्ती काही फुलवण्याची हौस असेल तर, शहराबाहेर अलॉटमेंट करतात. म्हणजे तुम्ही एक जमिनीचा छोटासा तुकडा भाड्यावर घेऊ शकता आणि तुम्हाला हवी ती झाडं त्यात फुलवू शकता, भाज्या लावू शकता, फुलं लावू शकता आणि तुमची हौस भागवून घेऊ शकता. रविवारी सकाळीच शेजारची मंडळी सगळा कुटुंब कबिला घेऊन, बगिच्यात काम करण्याची अवजारे घेऊन निघाली. संध्याकाळी त्यांच्या अलॉटमेंट मधली फुलं आणि फळं भेट म्हणून आम्हाला दिली, शेजारच्यांचे पाहुणे म्हणून.
एका मित्राकडे कॅलिफोर्नियात गेलो असताना बघितलं, त्याचं अंगण फारच मोठं होतं. अनेक प्रयोग त्यांनी त्यात केले होते. वेगवेगळी झाडं म्हणजे त्या भागात बनणारी फळं, त्यांनी लावली होती. जमेल तसं त्या बागेत काम करत ती बाग तो फुलवत होता.
खूप सुंदर फळं आणि फुलं या सगळ्या भागांमध्ये बघायला मिळाली. अमेरिकेतील शेती म्हणजे पूर्णपणे ऑटोमेटेड. लांब लांब पर्यंत पाणी घालणारे स्प्रिंकलर रस्त्याच्या आजूबाजूला बघायला सुद्धा छान वाटतात. आयडाहो नावाचा प्रांत खूप बटाटे पिकवतो. ती बटाट्याची शेती बघायला पण मजा आली होती. आपल्याकडे शिलॉंग जवळ बटाट्याची शेती , त्याची सुंदरशी फुलं बघितली होती पण आयडाहो ची शेती प्रचंड मोठी होती. एकूणच अमेरिकेमध्ये शेती प्रकार भव्य कारण जागा भरपूर आहे आणि ऑटोमेशन मुळे ती करणेही त्यांना सोपे सुकर झालेलं आहे. अनेक प्रकारची फळझाडं जी भारतात बघितलेली नव्हती, ती बघताना मजा येत होती.
आफ्रिकेत सुद्धा झाड भरपूर. खरं तर त्यांच्याकडे पण लोकसंख्येचा प्रश्न आहेच पण कदाचित पाण्याच्या सुबत्तेमुळे असेल किंवा बराच समाज हा जंगलावर अवलंबून असल्यामुळे असेल अगदी विमानातून सुद्धा हिरव्या रंगाच्या अनेक छटा दिसतात. तिकडे खाल्लेल्या अनेक फळांमधून पॅशन फ्रुट रस आजही लक्षात आहे. ती वेल इथे मिळवून मी लावली आणि चक्क तिला फळं ही आलीत. आफ्रिकेला तर मी शेड्स ऑफ ग्रीन असंच नाव दिले आहे.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.