पत्र क्र ४
रेल्वे च्या प्रवासाचे एक बरे असते, घ्या काहीपण सामान, नो प्रॉब्लम. कितिदातरी सहप्रवाशांच्या सामानाने प्रवास कठीण केलेला चांगला आठवतो. एकदा लग्नाचे वऱ्हाड होते , अनेक जण असल्यामूळे गाड़ीभर विख़ुरलेले....
जगाच्या पाठीवर .... कधितरी कुठेतरी पत्र क्र ४ रेल्वे च्या प्रवासाचे एक बरे असते, घ्या काहीपण सामान, नो प्रॉब्लम. कितिदातरी सहप्रवाशांच्या सामानाने प्रवास कठीण केलेला चांगला आठवतो. एकदा लग्नाचे वऱ्हाड होते , अनेक जण असल्यामूळे गाड़ीभर विख़ुरलेले. सतत कुठलातरी खाऊ घेउन इकड़ून तिकडे करत. खुप स्टॉक होता त्यांच्याजवळ. आम्हाला बघुन पण मज़ा येत होती. त्यांच्या सामानाची एक छोटी टेकडीच झाली होती दाराजवळ उतरताना. आणि कोलाहल किती तो, देवा रे!! आणि भुसावळ सुरत पॅसेंजर ला तर लाकडाच्या मोळयांसकट चढ़ायचे, आपले गाव आले की चेन ओढायची आणि पसार व्हायचे . विमान प्रवासात मात्र सामान म्हणजे चिंताच , काय घ्यायचे हयाचे नियम कधी बदलतात देव जाणे पर्समधली छोटी क़ाळी क्लिप एकदा १५ मिनिटे खाउन गेली, एकदाचि कचरापेटित जमा केली तेव्हाच सुटका झाली. तसेच एकदा छोटे नेलकटर पण शहिद केले. एकदा तर घरच्या क़िल्लीत असलेला अलार्म चा रिमोट च अड़कवला, तो मात्र शहीद करुन चालणार नव्हते. मग चर्चा, हयाला बोलव , त्याला बोलव, १५ मिनिट आणि मग सुटका. मेघालय, आसाम, अरुणाचल वगेरे फ़िरुन गुवाहाटी विमानतळ ग़ाठला, परतीच्या प्रवासासाठी. तिथुन थोड्या मातीत लावुन ऑर्किडस घेतले होते, घरी लावायला. सिक्यरिटी पर्यंत पोचले आणि हे allowed नाही म्हणाले . आता काय? नवरा तर वैतागलाच, काहिही घेतेस, वगेरे लेक्चर सूरु झाले, दे फेकुन. पण मी शांतपणे त्या ऑफिसरला विचारले का नाही चालत? तर म्हणे, माती allowed नाही. म्हटल , पॅक आहे, कुठेही पडणार नाही. त्यानी सांगीतले पड़ायचा प्रश्न नाही, ती नेणे allowed नाही. म्हणाला, माती टाकुन द्या आणि झाड़ न्या. असे का ते मात्र काही क़ळले नाही कधी. अमेरिकेत नुकताच अतिरेकी हल्ला झाला होता. मी बाली ला निघाले होते. बोर्डिंग साठी रांगेत असताना, एक बाई हातात भली मोठी लोणच्याची बरणी घेउन सगळयाना गयावया करत होती, प्लिज़ घ्या न, अमेरिकेत नेऊ देत नाहीत. पण कोण घेणार? तिने ठेवली मग तिथेच. तिथल्या एका स्टाफ़ ला विचारले तर म्हणे हल्ला व्हायच्या आधी नेऊ देत होते लोकांची चूक नाही हो. मुलगा लहान होता, आज़ीने एक बॅटरीवर चालणारे खेळणे दिले होते , ते क़वटाळुन security त पोचला. ते काही जाऊ देईनात. खेळण नाही नेता येणार . मुलगा पण सोड़ेना . मी विनंती करतेय पण दोन्ही पार्टीत समेट घड़ेना. मुलाने शेवटचे अस्त्र काढले आणि गंगा यमुना वाहु लागल्या. आता काय करावे? तेव्हढ्यात त्याच विमानाचा क्रू बाज़ुनी जात असताना पायलट च्या लक्षात आले, त्यानी सेल काढल्या, चेक केल्या . बाज़ूला असलेल्या ऑफ़ीसर शी काही बोलला आणि मुलाला सांगीतले, सेल मी तुला मुंबईला उतरल्यावर देइन , आणि मामला निपटला. सेओल ला तर माझी बॅग मागे पुढ़े करत शेवटी उघडायला लावली. लांब प्रवास, म्हणुन , अग़दी लागलेच तर असु द्यावे म्हणुन २ परोठे आणि थोड़ा छूँदा घेतला होता, तो नाही चालणार म्हणे. अरे, बनवायला किती मेहेनत लागतें रे, फेंकू कशी? त्याला म्हटल, तू खा, खुप मस्त आहे, हसला आणि ख़रच स्वतःच्या डब्यात काढ़ून घेतला, खाइन म्हणे नंतर .
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.