पत्र क्र ३
प्रवास म्हटला की तिकिट वगेरे बुकिंग आले . हल्ली घरबसल्या सगळ होत पण आधी तसे नव्हते हां रेल्वेची तिकिटे काढायला स्टेशन वर जाउन रांग लावावी लागे. ते हातानी लिहिलेले चार्ट, त्यात कधीतरी ग़ल्लत ठरलेली ....
जगाच्या पाठीवर .... कधितरी कुठेतरी पत्र क्र ३ प्रवास म्हटला की तिकिट वगेरे बुकिंग आले . हल्ली घरबसल्या सगळ होत पण आधी तसे नव्हते हां रेल्वेची तिकिटे काढायला स्टेशन वर जाउन रांग लावावी लागे. ते हातानी लिहिलेले चार्ट, त्यात कधीतरी ग़ल्लत ठरलेली . विमानाची तिकिटेपण विमानतळावरच जाउन काढावी लागत . रेल्वेचे ज़र वेटिंग तिकिट असेल तर ते कन्फ़र्म होईलका अशी शेवटपर्यंत धाकधुक. ते छोटे छोटे चौकोनी तुकड़े , सांभाळून ठेवावे लागत. टीसी कडे भला मोठा चार्ट असे, त्यावर सगळ match झाल, की सुटलो. विमानाचे ते मोठे ,आड़वे, गुळगुळीत , रंगित तिकिट खुप आकर्षक असायचे. इतके आवड़ायचे की अगदी सगळ वाचुन काढ़ायचे, काय न्या काय नेऊ नका अगदी तोंडपाठ झाले होते. ते तिकिट काउंटर वर दिले की पलिकड़ची व्यक्ति एक पान फाड़ायची आणि इतक वाईट वाटायच. पण internet चा तो ज़माना नसला तरी न गफलती फ़ार कमी व्हायच्या, निदान मी तरी कमी अनुभवल्या. हॉटेंल बुकिंग हां प्रकार सोपा नव्हता. म्हणजे अस की, इच्छित स्थळी पोचले की शोध घ्यायचा, जागा , खोली , भाड़े, असा सगळा मेळ जमला की झाल. हॉटेल्स पण खुप नसायची. पण तो शोध मज़ेदार असे. Internet अजुन नवीन होते, साल २०००. आम्ही सिंगापुर, मलेशिया वगेरे फिरायला निघालो. ईथून ईमेल पाठवुन बुकिंग केले होते. आणि सर्व उत्तरांचे प्रिंट काढ़ून सोबत घेतले होते. त्याप्रमाणे श्रीलंका, बैंकॉक, पटाया , सिंगापुर अगदी निर्धोक पार पडले. २ जानेवारी २००० च्या सकाळी कौलालंपुर च्या नविनच झालेल्या विमानतळावर उतरलो. नवीनच मोनो रेल, मग इमिग्रेशन वगेरे करुन बाहेर आलो. घ्यायला येणारा दिसेना. बराच वेळ गेला. मग तिथल्या एका अधिकाऱ्याने मदत केली, एक टैक्सी ठरवून देत आमचि रवानगी केली. प्रिंट आमच्या कडे होती त्यामूळे बाकी हॉटेल वगेरे मधे प्रश्न आला नाही . पण घ्यायला येणारा का नाही आला? तर , त्याला ईमेल वाचता येत नव्हते आणि मोबाइल अजुन फ़ारसे प्रचलित नव्हते😂 तेव्हापासून मात्र प्रत्येक वेळी डबल चेक, आणि मोबाइल मधे रोमिंग सुविधा.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.