पत्र क्र ३३

दूर खंड्या सुर मारताना दिसेल. पाणकावळा पंख सुकवत असेल. खुप प्रकार. घनदाट झाड़ीतुन बोटिने फिरत पक्षी बघायला काही औरच मज़ा येते. ब्रिटन मधे अनेक पार्क्स फिरलो. पक्षी इतके स्वच्छ्न्द पणे विहरत असतात....

कीर्ती वडाळकर
||2 min read

जगाच्या पाठीवर … कधीतरी कुठेतरी पत्र क्र ३३ निसर्गप्रेमी लोक कुठेही गेले तरी पहिले निसर्गरम्य स्थळच शोधणार. पक्षी, प्राणी कुठे आहेत त्या जागा शोधणार. मॉल बिल येतातच मागुन. भारतात जसे अभयारण्य बघतो तसे च परदेशी पण ट्रिप च्या आधीच माहिती घेउन , जाउन येतोच. सिंगापुर ला जुरॉंग बर्ड पार्क आपण बघतोच. पण तिथे ही अनेक छोटे छोटे नेचर ट्रेल्स क़ेलेत त्यांनी, बरेच पक्षी दिसतात. वीयट्नाम चे त्रा सु बर्ड पार्क पण आवर्जुन बघावे अशी जागा. खुप मोठया परिसरातले जंगल. कितीतरी वेळ फिरु शक़तो अशी जागा. पण अर्थात् बोटीनेच फिरावे लागतें. किती अगणित पक्षी बघितले तिथे. आधी मोठी मोटरबोट, मग छोटी मोटरबोट आणि शेवटी वल्हवत न्यायची बोट. मोठमोठया कमळाच्या बनातुन पक्षी बघत फिरायचे. कमळ सुद्धा क़ित्ती मोठे!! सुंदर गुलाबी रंगांचे. त्यांचे राष्ट्रीय फूल. आपल्या तळ हाताएवढी एकेक पाक़ळी. त्याभोवती रुंजी घालणारे पक्षी. त्यावर उड़णाऱ्या किडयांना पकडणारे. कुठेतरी दूर खंड्या सुर मारताना दिसेल. पाणकावळा पंख सुकवत असेल. खुप प्रकार. घनदाट झाड़ीतुन बोटिने फिरत पक्षी बघायला काही औरच मज़ा येते. ब्रिटन मधे अनेक पार्क्स फिरलो. पक्षी इतके स्वच्छ्न्द पणे विहरत असतात. लंडनच्या भर वस्तीतले हाइड पार्क असो की लांबचे black पार्क , लोक पण त्यांना अजिबात त्रास देत नाहीत. हाईड पार्क तर भर वस्तीत. एकीकड़े Kensington palace, Paddington स्टेशन पासून जवळ. पण हिरवळ आणि पक्षी खुप. ट्राफलगार हुन बकिंगहॅम palace साठी चालत निघालो, फिरत फिरत. रस्त्यात बर्डकेज वॉक आहे. नावच जरा बुचकळयात टाकणारे. उगाच मनात शंका. तिथे पिंजरे क़ेलेत की काय, वगेरे. पण सेंट जेम्स पार्कमधल्या एका रस्त्याचे ते नाव कारण पहिल्या जॉर्ज राजाला सुंदर पक्षी पाळायची आवड होती. आणि ह्या पार्क मधे त्याने अनेक पिंजरे लावुन ते पक्षी ठेवले होते. पण आता पिंजरे नाहीत. मात्र पक्षी आहेत खुप. तिथे प्रत्येक गावात पार्क मधे असे पक्षी हमखास बघायला मिळतात. कॉट्सवर्ल्ड चे रम्य असे बर्टन ऑन द वॉटर गाव. नदीतुन संथपणे विहरत जाणारे पाणपक्षी. खुपशी शांतता. मधेच कोणी माणसे . अगदी चित्रच खरे झालेय की काय असा भास व्हावा. ज़ुबिलि रिवर चा नेचर ट्रेल पण एकदम अविस्मरणीय. एक बाजूला नदी, दुसरीकडे दाट झाड़ी. मधेच लांब वस्ती. चालणारे तुम्हीं आणि पाण्यावर , काठावर , आकाशात, झाड़ांवर पक्षीच पक्षी !! किती दूर चालत गेलोय ते जाणवतच नाही. बर्नम बिचेस हे पण असेच एक वाइल्डलाइफ़ पार्क. चालत फिरायला मस्त. ऊंच वृक्षराज़िंमधुन फिरत चला, पक्षांच्या किलबिलाटात, त्यांना शोधत. वेळ कुठे जातों कळतच नाही. शहरी गजबजाटापासून खुप लांब. शांत आणि रम्य जागा. व्हर्सायचा बगीचा. राजवाडा बघून झाल्यावर हे आखीव रेखिव निसर्गचित्र अनुभवायलाच हवे. झाड़ांच्या भूलभूलैय्या तुन सायकल घेउन फिरत चला. किती तरी पक्षी दिसतात. यूरोपच्या पक्षांबद्द्ल वाचले होते , पण प्रत्यक्ष फिरुन पक्षी बघताना हरखुन जायला होतं.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments