पत्र क्र २२
लहानपणी बर्फ़ फ़क्त फ़्रीझर मधे आणि फ़्रीझर च्या बाहेर बघीतला होता. हे नो फ़्रॅास्ट वाले फ़्रीझ बरेच नंतर आले न…. बाहेर बर्फ़ पसरलेला असतो , तो सुंदर दिसतो, कींवा त्यानी खुप असह्य थंडी वाजु शकते हे...
जगाच्या पाठीवर … कधीतरी कुठेतरी पत्र क्र २२ लहानपणी बर्फ़ फ़क्त फ़्रीझर मधे आणि फ़्रीझर च्या बाहेर बघीतला होता. हे नो फ़्रॅास्ट वाले फ़्रीझ बरेच नंतर आले न…. बाहेर बर्फ़ पसरलेला असतो , तो सुंदर दिसतो, कींवा त्यानी खुप असह्य थंडी वाजु शकते हे कळायला बरेच प्रवास करावे लागले. सर्वप्रथम डोंगरउतारावर पसरलेला बर्फ़ बघीतला तो गुलमर्ग ला. अतिशय अप्रूप वाटले . पांढराशुभ्र बर्फ़!! बघावा तिथे पसरलेला नुसता. आधी त्यात खेळायला मज़ा आली. पण तिथल्या काही लोकांनी , लहान मुलानी फ़ार वेळ खेळु नये बर्फ़ात, हात गोठतात असे सांगीतले आणि आमच्या सामान्य ज्ञानात भर घातली. ख़र तर त्या बर्फ़ाबद्द्ल भितीच घातली. गुवाहाटी हून, बोमडिला दिरांग असे टप्पे घेत तवांग च्या दिशेने निघालो होतो. रस्त्यात अनेक ठिकाणी डोंगरउतारावर चरणारे याक दिसले. थंडी भरपूर होती. सेला पास ला पोचलो. तिथे देऊळ होते. हे तर बघायलाच हवें असे ड्राइवर म्हणाला. तर उतरलो. जरा आजुबाजुला बघितले तर नुसते काचेचे तुक़डे पड़लेले ज़िकडेतिकडे. अरे देवा, हे काय? ड्राइवर हसला, ज़वळ जाउन बघा म्हणे. तो चक्क बर्फ़ होता. इतके खुष झालों. वर चढून गेलो थोड़े तर वा काय नजारा!! अगदी भूसभूशित बर्फ़!! खुप मज़ा आली. तिथुन पुढ़े तो बर्फ़ सगळीकडेच सोबत होता. सेनेची परवानगी काढ़ून चीनच्या सीमेंकडे निघालो पण अर्ध्यावरूनच परत यावे लागले कारण पूढ़े फ़ार बर्फ़ पड़तों आहे, प्रवाशाना जाता येणार नाही असा सेनेच्याचौकित निरोप आला. गंगटोक हुन बाबा मंदिर , नथुला पास आणि चीन सीमेपर्यंत चा प्रवास . मस्त थंडी होती. पण जसजसे वर चढू लागलो आजुबाजूचा नजारा अधिकाधिक सुंदर होत गेला. निगूतीने बनवलेल्या एखाद्या पदार्थावर सुशोभित करण्यासाठी जसे खोबरे आणि कोथिंबिर पसरतात अगदी तसेच वाटत होते. भूसभुशित , शुभ्र पांढरा बर्फ़ आणि अधुनमधुन ड़ोके वर काढणारे गवताचे पाते!! दूरदूरपर्यंत असाच नजारा! रस्त्यात चांगु लेक. पाणी जवळजवळ गोठलेले. बघावा तिकडे बर्फ़. त्या तलावाचे पाणी पूर्णपणे गोठते. इतके सुंदर दिसत होते. शुभ्र पांढरी चादर पांघरून सृष्टि निजलीय असे भासत होते . डीडीहाट हून मुंसियारी ला पोचताना पंचकुली शिखरे दिसायला लागतात. पूर्णपणे बर्फ़ाच्छादीत ! इतकी मस्त दिसतात. इतकी छान नावें, कांचनगंगा, पंचकुली पण कसले उच्चार करतात, अरे देवा! असाच सुंदर बर्फ़ दिसतो टायगर हिल्स वरून, दार्जिलिंग च्या जवळच्या. सतत शुभ्र बर्फ़ाच्छादित कांचनगंगा!! दार्जिलिंग सिक्किम च्या प्रवासात किती साथ करते. सूर्योदयाच्या वेळी बघावे म्हणुन गंगटोक हुन पहाटे चारला च निघालो. अंधरातच व्यू पॉईंट गाठला. आणि थंडित तिथे मिळणाऱ्या उक़ळत्या कॉफ़ी चा आस्वाद घेत सूर्योदयाची वाट बघत बसलो. जसजसे सूर्यकिरण पसरू लागले तसतसे बर्फ़ाचा तो डोंगर आगीचा भासू लागला. गडद केशरी रंग. आणि नंतर तर लखलखत्या सोन्यासारखा दिसू लागला. काहीच मिनिटाचा खेळ!! आणि पुन्हा कांचनगंगा आपल्या मुळ रूपात समोर!!
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.