पत्र क्र २१

ऊन पावसाचा खेळ जोवर मापात असतो तोवर त्याची मज़ा घेता येते. पण प्रमाणाबाहेर गेल्यास….. झालच न तस. दिल्ली विमानतळ. बाहेर प्रचंड तापलेला सूर्यनारायण. ३ वाज़ता च्या विमानासाठी वेळेत सगळे सोपस्कार आटपुन...

कीर्ती वडाळकर
||3 min read

जगाच्या पाठीवर … कधीतरी कुठेतरी पत्र क्र २१ ऊन पावसाचा खेळ जोवर मापात असतो तोवर त्याची मज़ा घेता येते. पण प्रमाणाबाहेर गेल्यास….. झालच न तस. दिल्ली विमानतळ. बाहेर प्रचंड तापलेला सूर्यनारायण. ३ वाज़ता च्या विमानासाठी वेळेत सगळे सोपस्कार आटपुन बोर्डिंग गेट ला पोचलो. बराच वेळ होता. पण विमान आले आहे आणि बोर्डिंग चालु होईल असे सांगण्यात आले. समोर महाकाय असे ते विमान उभे होते. क्रू पण दिसत होता. पण काहीतरी गड़बड़ वाटत होती. ३ वाजून गेले तरी बोर्डिंग ची announcement होईना. डेस्क वर पण काही हालचाल दिसेना. बराच वेळ गेला. पायलट आला आणि विमानात काहीतरी बिघाड झाला आहे, repair झाले की बोर्डिंग चालु होईल, असे सांगून गेला. सतरा तासाचा सलग प्रवास करुन ते विमान सानफ़्रांसिस्को हुन आले होते. सहा वाजुन गेले. लोकांची सहनशक्ति संपली. आरडाओरडा सूरू झाला. त्यात अजुन काही काळ असाच सरला. काय होतय कळत नव्हते. बाहेर सूर्य कलतीला पोचला. आणि पावणेसात च्या दरम्यान बोर्डिंग सूरू झाले. सगळे अगदी वैतागले होते तर धावले विमानाकडे. आत पाऊल टाकतो तर काय? भट्टी होती ती. विमानाचीं कूलिंग सिस्टम बंद पडली होती. आधी वाटल, तो काय बिघाड सांगत होता ते दुरुस्त होईपर्यंत कूलिंग बंद च असेल न तर होईल थोड्या वेळात थंड . जागेवर पोचलो तर सगळ इतक गरम होत, पेटलेले जणु . कुठेही हात लावायची परिस्थिति नाही. काय करावे? गरमीने जीव कासावीस होऊ लागला. तशात विमानाचे दरवाज़े पण बंद झाले. आणि टोइंग सुरू. एका बाईने गोंधळ घालायला सूरवात केली, पण आता दरवाज़े बंद झालेत विमान ऊड्डाणाच्या वाटेंवर आहे, थोड़े थांबा आकाशात पोचल्यावर होईल थंड, अशी announcement झाली. आपोआप कसे थंड होईल ? वगेरे विचारे पर्यंत विमानाने ऊड्डाण केले होते. ज्याना त्रास होत होता त्याना पाणी दिले जात होते. हवा घ्यायला पेपर पण . ऊँची गाठल्यावर ख़रच थोड़े थंड झाले. जेवणखाण झाले. पण जशी मुंबई जवळ येऊ लागली आणि विमान ख़ाली येऊ लागले पुन्हा जीव घाबराघुबरा . कसेबसे जीव मुठित धरुन बसलो. एकदाचे मुंबई विमानतळ आले. दार उघड़े पर्यंत सुद्धा धीर धरवत नव्हता. पावसाच्या रौद्र रूपाने अविस्मरणीय झालेला असाच एक प्रवास . मुंबई ते आदीसअबाबा, थेट फ़्लाइट. मुंबईहुन सकाळच्या अकराच्या सुमारास निघाले. तिथे तिकडच्या , संध्याकाळच्या चार वाज़ता पोचणार होते. सगळा प्रवास खुप मजेत झाला. दिवस असल्याने बाहेर बघायला पण छान वाटत होते. आदीसअबाबा अर्ध्यातासावर असावे. इमिग्रेशन चे फ़ॉर्म भरुन झाले. उतरायचीं सर्व तयारी झाली . इथियोपियन हद्दीत पोचलो असू आणि बाहेर धोधो !! वीज़ाचा कड़कडाट. इतके भयावह दृश्य. प्रत्येक जण देवाचा धावा करताना दिसत होता. विमान हेलकावे खात होते. बाहेर नुसता कड़कड़ाट, अंधारुन आलेल. बापरे!! काय होईल आता? बराच प्रयत्न केला पायलट नी. सतत announcement चालु होती. बराच काळ लोटला. आणि landing करु आता असे सांगीतले गेले. बाहेर इतके भयानक वातावरण होते, कसा उतरवेल हां विमान? अथक परिश्रमाने landing तर झाले. बाहेर बघितले आणि सगळेच आश्चर्यचकित झालो. बाहेर खुप पाऊस आणि मोठमोठया गारा पडत होत्या. ज़मीन तर दिसतच नव्हती. म्हणजे गारा खुप वेळ पडत असाव्यात. विमान एके ठीकाणी नेउन उभे तर केले, पण ना बाहेरून शिडी लाऊ शकत होते ना एरोब्रिज, तो तर खुप लांब होता. चांगले दिड दोन तास !! आम्ही आतच अडकून पडलो होतो. पाऊस आणि गारा थांबायचे नावच घेईनात. शेवटी त्या विमानतळावरच्या लोकांनी हिम्मत केली आणि विमान हलवुन कसेबसे एरोब्रिजपर्यंत पोचवले आणि सगळयानी सूटकेचा निश्वास सोडला.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments