पत्र क्र १८
ऊन्हाळा जरी आपल्या भागाचे वैशिष्ट्य असले तरी जागतिक तापमान वाढीमुळे अलिकड़े सर्वच देशामधुन लोकांची भंबेरी उडवून दिली आहे उन्हानी. काही वर्षापूर्वी, एका सेमिनार मधे भेटलेली फ़्रेंच मैत्रिण. मला...
जगाच्या पाठीवर … कधीतरी कुठेतरी पत्र क्र १८ ऊन्हाळा जरी आपल्या भागाचे वैशिष्ट्य असले तरी जागतिक तापमान वाढीमुळे अलिकड़े सर्वच देशामधुन लोकांची भंबेरी उडवून दिली आहे उन्हानी. काही वर्षापूर्वी, एका सेमिनार मधे भेटलेली फ़्रेंच मैत्रिण. मला म्हणाली होती, “मला भारतात फिरायचे आहे. खुप वाचले आहे मी तुमच्या देशाबद्द्ल. पण मी तुमच्या ऊन्हाला घाबरते, खुप गरमी असते न ग?” तेच फ़्रांस गेले काही वर्ष ४० डिग्रीज़ च्या वर तापमान सहन करतेय. ख़रतर यूरोप म्हणजे थंड हवा हे समीकरण आपल्या डोक्यात फ़िट्ट बसलेय. पण ऊन तिथेही पोचलेच. कधीच गरमीचीं सवय नसल्याने लोक सैरभैर होतात अगदी. जंगलात लागणारे वणवे आणि त्याने वाढणारे तापमान, हे बरेचसे कॉमन झालेय हल्ली. कॅनडात पेटलेला वणवा कींवा California ची फ़ेमस calfire. त्या जंगलाच्या बाज़ूने जाताना जळलेले उभे वृक्ष बघून वाईट वाटते. California म्हणजें खुप सुंदर भाग. सर्वच दृष्टिने, निसर्ग, हवा , पाणी . सगळयाना आकर्षित करणारा प्रांत. पण आताशा असाच खुप उष्णतेला सामोरा जातों. आम्ही ज़ेव्हा तिथे पोचलो तेव्हा हवा छान होती. इथून निघालो तेव्हा ईथे मात्र प्रचंड ऊन होते. ईतके बरे वाटले. चला ह्यावर्षीचा उन्हाळा मजेत जाणार तर….. अनेक पार्क्स मधुन फिरलो. California मधे जिथे वणवा पेटला होता , आम्ही जायच्या काही दिवस आधीच तो भाग पण बघितला. कोळसा नुसता, झाड़े, जनावरे सगळ जळून बेचिराख झालेले. आणि तापमान पण वाढलेले. ख़रतर ईथल्या उन्हापासून लांब गेलो होतों आणि सुरूवातीला काही दिवस छान थंड पण होते. अचानक एक दिवस वॉर्निंग आली, तापमान खुप वाढणार आहे, सावध रहा. आता कळेना सावध कसे रहाणार. बघु काय होते ते. आणि ख़रच दुसऱ्याच दिवशी उष्णता जाणवु लागली. नेहेमीच थंड असणाऱ्या त्या प्रदेशात लोकांकडे AC सोडा साधे पंखे पण नाहीत, गरजच पडली नाही न कधी. अरे देवा, आता काय? धावलो मॉल च्या दिशेने. बघतो तर काय? तिथे हीsssss गर्दी. सगळे लोक पंखे घ्यायलाच आले होते. पण हे संकट अचानक उद्भवलेले होते, त्यांच्याकडे तरी स्टॉक कुठुन असणार? हात हलवत परत आलो. दुपारुन पुन्हा प्रयत्न करु या म्हणत एका छोट्या मॉल मधे शिरलो. आणि आश्चर्य म्हणजे तिथे चक्क ६ पंखे होते. आम्ही जरा विचारात पड़लो, कारण अर्थातच ते दुकान लहान होते तर उगाच शंका, जुना स्टॉक असेल का? कीम्मतही जास्तच होती, भारतात तेवढ्या पैशात चांगले ३ पंखे आले असते. असा विचार करेपर्यंत रॅक वरचे ४ पंखे ग़ायब झाले! मग मात्र मुंबईत लोकल पकड़ताना करतो तशी चपळाई करुन एक पंखा हस्तगत केला. हातात धरुन अक्षरशः गावभर नाचवत आणला. शेज़ारीण धावत आली कुठे मिळाला विचारत. तिला सांगीतले, एकच उरला होता, बघ जाउन. त्या पंख्याने तीन दिवसाचा तो उन्हाळा सुकर झाला .
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.