पत्र क्र १५
खरेदी म्हणजे, प्रत्यक्ष वस्तु विकत घेतलीच पाहीजे असे नाही ह, बाज़ारपेठेचा फेरफटका सुद्धा मज़ेदार असतो. काही ठिकाणी मोठे मॉल असतात तसेच स्थानिक होतकरुंसाठी छोटे बाज़ार पण असतात, आणि दोन्हीचीं आपली...
जगाच्या पाठीवर … कधीतरी कुठेतरी पत्र क्र १५ खरेदी म्हणजे, प्रत्यक्ष वस्तु विकत घेतलीच पाहीजे असे नाही ह, बाज़ारपेठेचा फेरफटका सुद्धा मज़ेदार असतो. काही ठिकाणी मोठे मॉल असतात तसेच स्थानिक होतकरुंसाठी छोटे बाज़ार पण असतात, आणि दोन्हीचीं आपली आपली एक शान असते. हे चीनी आक्रमण जगात सर्वदूर दिसते हां. आयफेल टॉवर च्या दुकानात फ़िज मॅग्नेट मेड़ इन चायना!! सान फ़्रांसिस्को च्या पियर ३९ च्या दुकानात वस्तु मेड़ इन चायना. तिथे तर एक चायना टाउन च आहे, सिंगापुर सारख़े. मोठया प्रमाणात उत्पादन केल्यामुळे क़ीमती कमी ठेवता येतात ज्या स्थानिक मर्यादित उत्पादनाला मारक ठरतात. तरीहि स्थानिक होतकरु कलाकार धड़पड़ करताना बघुन त्यांच्या दुकानातच ज़ायची ईच्छा होते. स्कॉट्लंड च्या सुंदर भागात नाही तर अजुन कुठे जा, ते फ्रिज मॅग्नेट मेड़ इन चायनाच. मग त्या फ्रिज मॅग्नेट घेण्यातला उत्साह कमी झाला. मात्र वीयट्नाम मधे, समोरच बसून , बांबुच्या बारीक तासाची चटई ती विणत होती. त्यावर सुंदर पेंटिंग करुन मागे मॅग्नेट चिटकवुन देत होती. फारच सुंदर! मी तिथे खुप वस्तु घेतल्या. युगांडा चा आर्ट बाज़ार गावोगावी भरतो. तिथे मणी विविध प्रकारचे मिळतात. म्हणजे नेहेमीचे बारीक आणि रंगित तर आहेतच पण कागदापासून बनवलेले, बांबुपासून बनवलेले, मातीचे, धातुचे कितीतरी प्रकार! आणि त्यापासून बनवलेले सुंदर सुंदर दागिने आणि इतर वस्तु. साध्या मण्याच्या चप्पल, गोफ़ , कानातले वगेरे वस्तु तिथल्या काही मैत्रिणीनी भेट दिल्या. मी इतर मण्याच्या वस्तु घेत होते. त्या विक्रेतीने एक सुंदर काळा पांढरा सेट दिला. म्हणे हां तर इथला स्पेशल आहे. कारण तो जंगली म्हशीच्या शिंगापासून मणी करुन बनवलेला आहे. बापरे मी लगेच परत दिला. म्हशीचे शिंग गळयात घालून मी फिरतेय असे विनोदी दृश्य नज़रेसमोर आले. पण गम्मतच झाली. बरोबरच्या मैत्रिणीला वाटले मला तो महाग वाटला की काय, तिने गपचुप जाउन विकत घेउन मला भेट दिला. आता काय करावे? हनोईचा बाज़ारपण खुप सुंदर. ग़ल्ली बोळातून पसरलेला. अंड्याच्या कवचाचे बारीक तुकडे चिकटवुन अनेक वस्तु विकायला. बांबुच्या वस्तु, पेंटिंग्ज, किती न काय . नेत्रदीपक ! लाकड़ाच्या सुंदर छोट्या पेटया, त्यावर रंगकाम कींवा अंडयाच्या कवचाचे काम, शंखाचे तुकडे चिकटवुन केलेले काम , गवत वापरुन केलेले डेकोरेशन!! वैविध्य तर किती! शिवाय मोती, खुप ठिकाणी मोत्याचीं शेती करतात. अशा एका शेताला पण भेट दिलीच. कंबोडियात पण खुप सुंदर वस्तु पण लक्षात राहील्या त्या नारळाच्या कवटीपासून बनवलेल्या सुंदर पर्सेस!! कॉट्सवर्ल्ड च्या सुंदर आख़ीवरेखीव ग़ावामधुन फिरताना तिथे एक स्थानिक वस्तुंचे प्रदर्शन बघायला गेलो. एक आजी दिसली एका स्टॉलवर. काहीतरी विणत होती. गेले तिच्यापाशी. सुंदर हसली. ८५ च्या पुढ़े वय होते पण अत्यंत तुड़तुड़ित. एकटीच ऊरलेय म्हणे घरात. तरुण वयात फ़ायर ब्रिगेड मधे क़ामाला होती. आता विणकामात मन रमवते. आणि त्या छोट्या छोट्या वस्तु विकून गरीब मुलाना शिक्षणासाठी मदत करते. मुख्य म्हणजे, वस्तुवर कींमत नव्हती. तिथे एक बॉक्स होता, तुम्हीं त्यात तुम्हाला जे योग्य वाटेल ते मूल्य जमा करा , आजी मागणार नव्हती काहीच …….
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.