प्रस्तावना — जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी

जन्माच्या पाचव्या दिवशी, कुंडली मांडत, त्र्यंबकच्या देव शास्त्रींनी,” ही खुप प्रवास करेल” असे भाकित लिहिले. आणि ते खरे ठरवण्यासाठीच जणु की काय , ख़रच खुप प्रवास केला, कामासाठी, मज़ेसाठी, हेतु काहिही...

कीर्ती वडाळकर
||1 min read

जगाच्या पाठीवर ... कधीतरी कुठेतरी जन्माच्या पाचव्या दिवशी, कुंडली मांडत, त्र्यंबकच्या देव शास्त्रींनी,” ही खुप प्रवास करेल” असे भाकित लिहिले. आणि ते खरे ठरवण्यासाठीच जणु की काय , ख़रच खुप प्रवास केला, कामासाठी, मज़ेसाठी, हेतु काहिही असो, प्रवास मात्र झाला. चार धाम यात्रा क़रावी, असे पूर्वी सांगत . प्रवास माणसाला खुप काही शिकवतो, अनुभव समृद्ध करतो, असे म्हणत. पूर्वी प्रवासही खड़तर असे मग अनुभव तर येणारच, सूज्ञ लोक ह्या समृद्ध अनुभवातुन शहाणे होत. डबक़यातला बेडूक समुद्रात पोचल्यावर जसा बदलेल अगदी तसेच. पण हल्ली कुठे प्रवास खड़तर राहिला आहे? अर्थात्, हे प्रत्येकाच्या मानण्यावर आहे. प्रत्येक प्रवासाचीं मज़ा न्यारी. वेगवेगळी माणसे , त्यांचा दिनक्रम, भाव भावना, वेष, पदार्थ, निसर्ग, परिसंस्था, सगळसगळ वेगळ . अनेक प्रकारे शिकवणारे. असेच काही छानसे अनुभव!! अनेक सहप्रवाशांना सांगायचे राहुन गेलेले. कारण पत्र लिहिलेच नाहीत न चला तर मग , down the memory lane..........

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments